भुसावळातील गोल्डन अवर हॉस्पीटलमध्ये प्रधान मंत्री जनआरोग्य योजनेसह महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे उद्घाटन
Inauguration of Mahatma Phule Jan Arogya Yojana along with Pradhan Mantri Jan Arogya Yojana at Golden Hour Hospital in Bhusawal भुसावळ (22 ऑगस्ट 2025) : भुसावळ शहरातील आनंद नगरातील ‘गोल्डन अवर हॉस्पिटल’ मध्ये शुक्रवार, 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसह महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे उद्घाटन भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक किरण कोलते यांची प्रमुख उपस्थिती होती.
रुग्णांसाठी योजना लाभदायी ठरणार
यावेळी रजनी सावकारे म्हणाल्या की, दोन्ही योजनांमुळे विविध प्रवर्गातील लाभार्थी रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून वेळेत उपचाराची सोयही होणार आहे.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी रुग्णालयाचे सर्वेसर्वा डॉ.शांतनू कुमार साहू व संचालिका ईतीश्री साहू यांनी रजनी सावकारे व किरण कोलते यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

रुग्णसेवा ही ईश्वरसेवा : डॉ.साहू
प्रसंगी डॉ.शांतनू कुमार साहू म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून रुग्णसेवेचा वसा शहरात सुरू केला आहे. 24 तास रुग्णसेवेसाठी आमचे हॉस्पीटल खुले असून आता योजना सुरू झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा या माध्यमातून मिळणार आहे.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमप्रसंगी अॅडमिनिस्ट्रेटर असरार अहमद, मॅनेजर रियाज पटेल, फार्मासीस्ट जितेश ढाके, एच.आर.प्रमुख गिरीश कोळी, रुचिता इंगळे, कांचन खुपसे, रेहान शेख आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन पीआरओ गणेश वाघ यांनी करून आभारही मानले.




