पोलिस निरीक्षक झाल्याचा आनंद ठरला औट घटकेचा : एपीआय टू पीआय प्रमोट झालेल्या अधिकार्यांना कार्यमुक्त न करण्याचे आदेश

गणेश वाघ
The joy of becoming a police inspector turned out to be an outcast: Orders not to relieve officers promoted from API to PI भुसावळ (22 ऑगस्ट 2025) : अनेक महिन्यांपासून पोलिस निरीक्षकपदी बढती कधी मिळणार ? याकडे लक्ष लागून असलेल्या राज्यातील सहाय्यक निरीक्षकांची उत्सुकता गुरुवार, 21 रोजी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या आदेशानंतर संपली खरी, अनेकांनी आपल्याला पोलिस निरीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर आनंदही साजरा केला मात्र हा आनंद औट घटकेचा ठरला कारण बढतीनंतरच्या दुसर्याच दिवशी शुक्रवार, 22 ऑगस्ट रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक (सुप्रिया पाटील-यादव) यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावरून पोलिस निरीक्षक पदावर नियुक्त अधिकार्यांना कार्यमुक्त न करण्याचे आदेश काढल्यानंतर…!
आदेशामुळे आनंद ठरला औट घटकेचा
आदेशानुसार, मा.म.प्र.न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक 834/2025 अनुषंगाने महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन पत्र क्रमांक न्यायाप्र 1725/प्र.क.138/आरक्षण 2, दिनांक 21 ऑगस्ट 2025 अन्वये शासन निर्णय 21 जुलै 2025 मधील तरतुदीच्या अनुषंगाने पुढील कोणतीही कार्यवाही करण्यात येवू नये, असे प्रशासकीय विभागाने कळवले आहे.
संबंधित अधिकार्यांनी कोणत्याही अधिकार्यास हजर होण्यासाठी कार्यमुक्त करू नये तसेच जे पदोन्नतीसाठी हजर झाले आहेत त्यांना हजर करून घेवू नये, असे आदेशात नमूद असून संबंधितांना मूळ घटकात परत पाठवण्यात यावे, असे आदेशात म्हटल्याने आता अधिकार्यांना पुन्हा मूळ दुय्यम पोस्टवरच तूर्ततरी पुढील आदेश येईस्तोवर काम करावे लागणार आहे.