यावल शहरात मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा

शहरातील मोठा मारोती मंदिरात दर्शनार्थ गर्दी


यावल (22 ऑगस्ट 2025) : यावल शहरात बळीराजाचा सोबती सर्जा-राज्याचा सण पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कष्टकरी शेतकर्‍याच्या सोबत्याला पुरण पोळीचे नैवद्य दाखवुन, त्याचा श्रृंगार करून, ढोल-ताश्यांच्या गजरात शहरातून मिरवणूक काढत बैलजोडीचा सन्मान करण्यात आला. शहरातील देशमुख वाड्यात मोठा मारोती मंदीरात दर्शना करीता बैल जोड्यांना घेवुन शेतकरी वर्गाची दिवसभर ये-जा सुरू होती.

सणानिमित्त शेतकर्‍यांमध्ये उत्साह
यंदा संपत्या श्रावणाच्या सर्‍याचा पाऊस चांगला होत असल्याने बळीराजा आनंदीत आहे तर हा आनंद पोळा सणात दिसुन आला. शहरात सकाळ पासुन सर्वत्र बैल-जोडींच्या सजावटीत शेतकरी वर्ग मग्न होता. शहरात विविध ठिकाणी बैल जोडी सजावटीच्या सहित्यांच्या दुकानांवर गर्दी होती. तर साडे दहा वाजे नंतर शहरातील देशमुख वाड्यात मोठा मारोती मंदिरात बैल जोडीला दर्शनाकरीता आणत तेथे मारोतीला नारळ वाहून बैल जोडींच्या सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या व पोळा फोडण्यात आला.


घरो-घरी पुरणपेाळीचा नैवेद्य सर्जा-राजाकरीता बनवण्यात आला शेतकरी वर्गाचा हा मोठा सण हा यंदा खुपचं उत्साहात साजरा करण्यात आला. अबाल,वृध्द सह सर्वचं बैल जोडीला घेवुन शहरात मिरवणुकीत सहभागी झालेले दिसले. अनेकांनी शेतात जावून मातीच्या बैल जोडीचं पूजन करीत नैवेद्य वाढवले होते. दिवसभर शहर व तालुक्यात पोळ्याची धामधुम दिसली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !