भुसावळात पावसामुळे बसस्थानक, लोखंडी पुलाखाली पाण्याचे साचले तळे


भुसावळ (23 ऑगस्ट 2025) : शहरात गुरुवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील बसस्थानक, लोखंडी पूलाचे बोगदे येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने कृत्रीम तळे निर्माण होत असते. यामुळे वाहतूक विस्कळीत होते, पाण्याचा निचरा व्यवस्थित आणि वेगात करण्यासाठी पालिका प्रशासनाने नियोजन करावे, या बोगद्यांमध्ये 3 फुटापर्यत पाणी साचत असते. यामुळे वाहनधारक पाण्यातून वाहने टाकण्यास घाबरत होती.

गुरूवारी संध्याकाळी शहरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पावसाचे पाणी बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोरील बोगद्यांमध्ये साचले, या बोगद्यात सुमारे 3 फुटापर्यत पाणी साचले होते. यामुळे या बागेद्यातून लहान वाहनधारक यांनी वाहन नेण्यास नकार दिला. तर काही वाहनधारकांनी वाहने टाकल्यावर वाहने बंद पडली यामुळे वाहनधारकांना वाहने लोटत न्यावी लागली.


पालिका प्रशासनाने बोगद्यातील पाण्याचा निचरा वेगात होण्यासाीं नियोजन करून पावसाल्यात सुध्दा बोगदे वाहतूकीला सुरळीत ठेवता येतील याचे नियोजन करावे. अशी मागणी वाहन धारकांमधून केली जात आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !