श्री संत सेना महाराजांची प्रतिमा भेट

ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानचा उपक्रम


वरणगाव (23 ऑगस्ट 2025) : श्री संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांची 20 ऑगस्टल रोजी पुण्यतिथी असल्याने या पार्श्वभूमीवर वरणगाव येथील समस्त नाभिक मंडळ समाजाला ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानतर्फे श्री संत सेना महाराजांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी वासुदेव नेत्रालयाचे संचालक डॉ.नितु पाटील, बाबा, तुकाराम पाटील, वरणगाव नाभिक समाजाचे अध्यक्ष कमलेश येवले, उपाध्यक्ष श्रीराम सनांसे, खजिनदार रवी पवार, सचिव संतोष रेलकर, सदस्य रवींद्र शिवरामे, गणेश बोलनारे, सुधाकर शिवरामे, राजेंद्र आंबटकर, जंगो न्हावी, जय डिजिटलचे संचालक राहुल माळी, वासुदेव नेत्रालयातील सर्व सहकारी वर्ग उपस्थित होता.


महाराज यांचा प्रसिद्ध अभंग:
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक बारीक ॥
विवेक दर्पण आ1घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ॥
भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ॥
चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ॥







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !