सावद्यातील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रक्तदान शिबिराला प्रतिसाद
सावदा (23 ऑगस्ट 2025) : गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल, सावदा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका भारती महाजन यांनी केले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिरासाठी डॉ.राशी अग्रवाल, डॉ.आर्या नाईक, पीआरओ लक्ष्मण पाटील, राज तन्वर, यश वाघ, वृषाली जोगे, हिमानी नवले या टीमने तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.





