भुसावळातील एन.के.नारखेडे इंग्लिश स्कूलमध्ये आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
गोल्डन अवर हॉस्पीटलचा उपक्रम : 60 वर शिक्षकांची तपासणी : आहाराविषयी डॉक्टरांनी केले मार्गदर्शन
Spontaneous response to health check-up camp at N.K. English School, Bhusawal भुसावळ (23 ऑगस्ट 2025) : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश स्कूलमध्ये शहरातील गोल्डन अवर हॉस्पीटलच्या विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे शनिवार, 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी एक दरम्यान आयेाजन करण्यात आले. या शिबिराला स्कूलमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी 60 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचारही करण्यात आले.
यांची शिबिराला उपस्थिती
शिबिराच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे होत्या. यावेळी पर्यवेक्षिका राखी बढे, किर्ती वाघोदे आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन शबनम तडवी यांनी केले.

60 शिक्षकांची आरोग्य तपासणी
आरोग्य शिबिरात गोल्डन अवर रुग्णालयाचे आरएमओ डॉ.धनुष शिंगाडे, डॉ.सुनील बस्सी, सिस्टर शिवानी सावळे, सिस्टर खुशी कासडे आदींनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांची आरोग्य तपासणी केली. यावेळी रुग्णालयाचे पीआरओ गणेश वाघ उपस्थित होते. प्रसंगी शिक्षकांचा रक्तदाब तपासण्यात आला तसेच रक्ताची चाचणी करण्यात आली व ईसीजी काढून आरोग्याविषयी जागरूकता करीत आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.




