महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या पदाधिकार्यांची निवड
भुसावळात तालुकास्तरीय बैठक उत्साहात
भुसावळ (24 ऑगस्ट 2025) : झुंजार लेवा समाज मंडळाच्या बी.व्ही.खाचणे सभागृहामध्ये लेवा पाटीदार महासंघाची भुसावळ तालुकास्तरीय बैठक नुकतीच झाली. महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष . अरुण बोरोले यांनी मनोगतातून लेवा पाटीदार समाजातील अनेक बाबींवर प्रकाश टाकला. यावेळी विविध पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.
लेवा पाटीदार मित्र मंडळ, पिंपळे सौदागरचे अध्यक्ष कृष्णाजी खडसे यांनी विवाहाची आचारसंहिता या विषयात हात घालत लेवा समाजासाठी आदर्श विवाह आचारसंहितेकरिता 27 नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. जळगावचे माजी नगराध्यक्ष बंडू दादा काळे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात ‘युवकांनी विधायक व सामाजिक कार्यात सहभाग’ या विषयावर सविस्तर माहिती दिली.

माजी आमदार नीळकंठ फालक यांनी लग्नातील वाद्य डी.जे. या संबंधित चांगल्या वाईट गोष्टींचे मार्गदर्शन केले. फैजपूरचे नरेंद्र नारखेडे यांनी ‘विवाहाची आचारसंहिता अनुपालन समिती’ तयार करण्यास मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाराष्ट्र लेवापाटीदार महासंघाने घालून दिलेल्या आदर्श आचार संहितची पालन करण्याची शपथ सर्व उपस्थितांना देण्यात आली. सामाजिक कार्यकर्ता कसा असावा याबद्दल डॉ. प्रमोद महाजन, नाशिक यांनी युवकांची चर्चा घडवत मार्गदर्शन केले.
विविध पदाधिकार्यांची निवड
यावेळी मान्यवरांच्या हस्ते तालुकास्तर व गावपातळीवरील पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र देण्यात आपले त्यामध्ये खान्देश विभाग संघटक म्हणून विनीत पाटील (हंबर्डीकर) भुसावळ, तालुकाप्रमुख मंगेश पाटील (भुसावळ), शहर उत्तर प्रमुख कैलास पाटील व भुसावळ शहर दक्षिणचे प्रमुख धीरज बर्हाटे व इतर पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाला लेवा भात्रृ मंडळ पुण्याचे अध्यक्ष विकास वारके यांनी कृषी अॅप विषयक मार्गदर्शन केले, महासंघाचे डॉ.मिलिंद पाटील, विभावरी इंगळे, अॅड.पुरुषोत्तम नेमाडे, अॅड.बोधराज चौधरी, भालोदचे हर्षल जावळे यांनी मार्गदर्शन केले. किन्हीचे कांतीभाई येवले, आचेगावचे अक्षय बेंडाळे यांनी युवकांच्या समस्या मांडल्या. गाव प्रमुख नियुक्ती मध्ये अंजनसोंडे गावप्रमुख नितीन भारंबे, बेलव्हाय गावप्रमुख महेश खाचणे, दर्यापूर गाव प्रमुख गिरीष पाटील, फेकरी गाव प्रमुख अतुल चोपडे, गोजोरा गाव प्रमुख हर्षल तळेले, तपतकठोरा गाव प्रमुख देवेंद्र पाटील, साकरी गावप्रमुख संकेत वारके, साकेगाव गावप्रमुख दिलीप वाघोदे, सुनसगाव गावप्रमुख हर्षल पाटील, तळवेल गावप्रमुख चेतन पाटील, वराडसीम गावप्रमुख पराग भारंबे, कंडारी गावप्रमुख युवराज महाजन, निंभोरा बु.॥ गावप्रमुख किरण बोरोले यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाला तालुकाभरातून जवळपास 173 युवक उपस्थित होते. तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेश पाटील तर आभार विनीत पाटील यांनी मानले.




