दोन हजारांचे लाच प्रकरण : भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील दोघा कर्मचार्‍यांना एका दिवसांची पोलिस कोठडी


Two thousand rupees bribe case : Two employees of Bhusawal taluka police station remanded in one-day police custody भुसावळ (24 ऑगस्ट 2025) : अटक वॉरंट न बजावता सहकार्य करण्यासाठी दोन हजारांची लाच खाजगी पंटराच्या माध्यमातून स्वीकारताना भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील दोन एएसआय यांना जळगाव एसीबीने अटक केल्याचा प्रकार शुक्रवार, 22 रोजी दुपारी घडला होता. अटकेतील आरोपींना शनिवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

एएसआय बाळकृष्ण मुकुंदा पाटील (55), एएसआय आत्माराम सुधाकर भालेराव (57) व खाजगी पंटर ठाणसिंग प्रतापसिंग जेठवे (42, . शिवपूर कन्हाळा, ता.भुसावळ) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

असे आहे लाच प्रकरण
47 तक्रारदाराविरोधात खामगाव कोर्टात भादंवि 138 प्रमाणे चेक बाऊन्सची केस दाखल आहे. तक्रारदाराविरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर वॉरंटची अंमलबजावणी न करण्यासाठी तसेच अटक वॉरंट कॅन्सल करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा मोबदल्यात एएसआय बाळकृष्ण पाटील यांनी पाच हजारांची लाच मागितली होती व 21 रोजी तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर पडताळणी केल्यानंतर बाळकृष्ण पाटील व सुधाकर भालेराव यांनी दोन हजारांची लाच मागणी केल्याचे स्पष्ट होताच सापळा रचण्यात आला.

आरोपींच्या सांगण्यावरून खाजगी पंटराने लाच स्वीकारताच तिघांना अटक करण्यात आली व त्यांच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींना आज कोर्टात हजर करणार
अटकेतील तिघा आरोपींना शनिवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर आरोपींना रविवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक हेमंत नागरे व सहकारी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !