भुसावळात हद्दपार आरोपीला बेड्या : जळगाव गुन्हे शाखेची कारवाई
Deported accused shackled in Bhusawal : Jalgaon Crime Branch takes action भुसावळ (24 ऑगस्ट 2025) : सामाजिक शांततेला अडसरू ठरू पाहणार्या उपद्रवीला प्रशासनाने हद्दपार केल्यानंतरही संशयीत शहरात डेरा जमवून असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळताच पथकाने संशयीताला अटक केली. आकाश श्याम इंगळे (पंचशील नगर, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव गुन्हे शाखेला आकाश इंगळे हा शहरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने गुन्हे शाखेने वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी आरोपीला अटक करीत बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन करीत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शरद बागल, ग्रेडेड पोलिस उपनिरीक्षक रवी नरवाडे, हवालदार गोपाल गव्हाळे, हवालदार उमाकांत पाटील, नाईक विकास सातदिवे, कॉन्स्टेबल राहुल वानखेडे, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने केली.