‘ते दहा दिवस’ या पर्यावरणपूरक चित्रपटातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
Awareness among students through the environmentally friendly film ‘Those Ten Days’ भुसावळ (24 ऑगस्ट 2025) : डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषात पर्यावरणाचे महत्त्व सांगणारा सामाजिक मराठी चित्रपट ‘ते दहा दिवस’ दाखविण्यात आला.
जलप्रदूषणावर चित्रपटातून प्रकाश
राघव फिल्म प्रॉडक्शन आणि बंधन प्रॉडक्शन यांच्यातर्फे निर्मित या चित्रपटाचा शो विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. ज्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रसिद्ध प्रतिसाद दिला. महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा गणेशोत्सव साजरा केला जात आहे परंतु पहिल्यांदाच त्यामुळे होणारे जलप्रदूषण व त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम या चित्रपटातून प्रकाशझोतात आणण्यात आलेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 मध्ये ‘मन की बात’ या कार्यक्रमात गणेशोत्सव, मातीच्या मूर्ती आणि जलप्रदूषण टाळण्याबाबत दिलेल्या संदेशावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक भारत वाळके आहेत. यात पर्यावरण संवर्धन, पाणी वाचवा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व यांसारखे महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आलेले आहे. समाजाला व शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दल जागृत करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवण्यात यावा ही प्रेरणा दिली.




