हज-उमराहसाठी जाणार्‍या भाविकांचा भुसावळ मुस्लिम मण्यार बिरादरीतर्फे सत्कार


Bhusawal Muslim Manyar community felicitates pilgrims going for Hajj-Umrah भुसावळ (24 ऑगस्ट 2025) : हज उमराहसाठी जाणार्‍या भाविकांचा भुसावळ मुस्लिम मण्यार बिरादरीतर्फे सत्कार करण्यात आला. शहरातील चार भाविक हे पवित्र उमराहसाठी मक्का मदीना येथे जात असल्याने त्यांचा मण्यार हॉलमध्ये सत्कार करण्यात आला. सलीमशेठ चुडीवाला, माजी नगरसेवक साबीर मेंबर, सय्यद फारुक अली, सादिक भाई टेलिफोन वाले, माजीद भाई बर्तनवाले, रऊफ रहमान, जुबेर भाई, रोनकभाई सुरतवाले, सय्यद साहब, मुस्लिम मन्यार बिरादारीचे आदी पदाधिकार्‍यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

यांचा झाला गौरव
याप्रसंगी सय्यद इरफान सय्यद फारुख अली व त्यांची पत्नी, नईम अहमद हाजी गुलाम मोहम्मद, सलमा बी.नईम अहमद इत्यादींचा गौरव करण्यात आला. उमराह हा इस्लाममधील छोटा हज मानला जातो. ही पवित्र यात्रा जी मक्का येथे केली जाते. इस्लाम धर्मात उमराहला छोटा हज करणे असे म्हटले जाते.


 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !