उद्धव ठाकरेंचा घणाघात ; धोका देणार्‍यांची डोकी फुटतील, शिवसेना फुटणार नाही !

ठाकरे उवाच ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या तपासणीचे आदेश


Uddhav Thackeray मुंबई (24 ऑगस्ट 2025) : धोके देणार्‍यांची डोकी फुटतील, पण शिवसेना फुटणार नाही, असा घणाघात शिंदे गटावर करीत

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या शाखेत कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले.




आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवसेना शाखेला ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी मतदारयादील घोळ आणि शिंदे गटावर टीका केली.

असे अनेक आले अन गेले
गेले दोन तीन वर्ष सतत प्रसारमाध्यमांतून येते की, इकडे शिवसेनेला धक्का, तिकडे धक्का. एकदा जाऊनच बघू किती धक्के बसलेत. असे धक्के देणारे अनेक जण आले आणि अनेकजण गेले. पण शिवसेनेला कुठेतरी कदाचित धक्का बसला असेल, पण धोका झालेला नाही. अनेकांनी धोके देण्याचे अनेक प्रयत्न केले. यानंतही ते होतील. पण जोपर्यंत तुमची तटबंदी मजबूत आहे. तोपर्यंत धक्का आणि धोके देणार्‍यांची डोकी फुटतील, पण शिवसेना फुटणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली.

गणराया, काळ्या मांजरांचा बंदोबस्त कर
गणेशोत्सवाच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी गणपतीच्या चरणी प्रार्थना केली. आम्ही हिंदुत्वाचा पवित्र भगवा घेऊन पुढे जात आहोत. वाटेत स्वतःला वाघ म्हणवणारे अनेक काळे मांजरे आडवी येतात. गणराया, त्या अपशकुनी मांजरांचा बंदोबस्त तूच कर, नाहीतर त्यांचा बंदोबस्त करायला आम्ही शिवसैनिक आहोतच, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर थेट हल्लाबोल केला.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !