भुसावळातील सिंधी समाजबांधवांची 26 रोजी मोफत आरोग्य तपासणी

बडा सेवा मंडलमध्ये आयोजन : गोल्डन अवर हॉस्पीटल व माजी नगरसेवक निकी बतरा यांचा उपक्रम


Free health check-up for Sindhi community members in Bhusawal on 26th भुसावळ (24 ऑगस्ट 2025) : भुसावळ शहरातील आनंद नगरातील गोल्डन अवर हॉस्पीटल व माजी नगरसेवक निकी बतरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग 21 मधील सिंधी समाजबांधवांची तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे आरोग्य तपासणी व औषधोपचार शहरातील बडा सेवा मंडलमध्ये मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 2 दरम्यान आयोजित शिबिरात करण्यात येणार आहे.

समाजबांधवांची होणार मोफत आरोग्य तपासणी
आरोग्य शिबिरात रक्तदाब (बी.पी.), डायबीटीस (शुगर), कार्डीओग्राम (ईसीजी) तपासणी मोफत करण्यात येईल शिवाय मोफत औषधोपचारासह आरोग्याविषयी तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करतील. या शिबिराचा समाजबांधवांसह प्रभागातील नागरिकांनी अधिकाधिक संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक माजी नगरसेवक निकी बतरा व माजी नगरसेविका पुष्पाबाई रमेशलाल बतरा यांनी केले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !