भुसावळ विभागीय व्यवस्थापकांकडून भुसावळ यार्ड व वरणगाव स्थानकाची तपासणी


भुसावळ (24 ऑगस्ट 2025) ; भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी भुसावळ यार्डची सखोल तपासणी केली. या तपासणीदरम्यान बडनेरा दिशेकडील गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गाची उभारणीसंदर्भातील सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. या उपक्रमामुळे विभागातील गाड्यांची वहनक्षमता वाढून गाड्यांची हालचाल अधिक सुरळीत व कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे.

याचबरोबर विभागीय व्यवस्थापकांनी वरणगाव स्थानकाचीही पाहणी केली. या तपासणीमध्ये प्रवासी सुविधा, स्थानक स्वच्छता, सुरक्षा उपाययोजना, सर्क्युलेटिंग क्षेत्र तसेच एकूणच स्थानक पायाभूत सुविधांची पाहणी करण्यात आली. प्रवासी तसेच स्थानक कर्मचार्‍यांशी संवाद साधून कार्यक्षमता, प्रवासी सेवा आणि अनुभव यांचा आढावा घेण्यात आला.


या तपासणी दरम्यान विभागातील संबंधित शाखेचे अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !