बसमधील गर्दीत शिरपूरच्या महिला प्रवाशाची सोन्याची बांगडी लांबवली : अंबरनाथच्या कुख्यात गुन्हेगाराला बेड्या

शिरपूर शहर पोलिसांची कामगिरी : 70 हजार रुपये किंमतीची बांगडी जप्त


Shirpur woman passenger’s gold bangle snatched in crowd on bus: Ambernath’s notorious criminal shackled शिरपूर (24 ऑगस्ट 2025) : जळगाव बसमध्ये चढताना वयोवृद्ध महिला प्रवाशाच्या हातातील 70 हजार रुपये किंमतीची सोन्याची बांगडी चोरीला गेली. गुरुवारी सकाळी 11.30 वाजता ही घटना घडल्यानंतर शिरपूर शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात कुख्यात आरोपीच्या मुसक्या बांधल्या. शुभम दशरथ सुर्यवंशी (27, रा.अंबरनाथ, जि.ठाणे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

कुख्यात आरोपीला बेड्या
वंदनाबाई रामदास सोनगिरे (61, रा.निमझरी नाका, गुरूदत्त कॉलनी, शिरपूर) या गुरुवार, 21 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या नातीसह चोपडा जाण्यासाठी शिरपूर बसस्थानकात आल्या व जळगाव बस लागल्यानंतर त्यात चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने 70 हजार रुपये किंमतीची 25 ग्रॅम वजनाची सोन्याची गोलाकार नक्षी असलेली बांगडी लांबवली.




कुख्यात आरोपीला पडल्या बेड्या
शिरपूर गुन्हे शाखेने गोपनीय माहितीद्वारे शुभम दशरथ सुर्यवंशी (27, रा.अंबरनाथ, जि.ठाणे) याच्या मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे आरोपीविरोधात आळेफाटा पोलिसात गुरनं. 96/2022 भादंवि कलम 393 तसेच चंदननगर पोलिसात गुरनं. 433/2019 म.पो.का.कलम 122 प्रमाणे, मुंढवा, जि.पुणे पोलिसात गुरनं. 288/2022 भादंवि कलम 324, 504 प्रमाणे, भोसरी, जि.पुणे येथे गुरनं.137/2019 भादंवि कलम 379 प्रमाणे, सोलापूर रेल्वे पोलिसात गुरनं. 34/2016 भादंवि कलम 392,439 प्रमाणे, कल्याण रेल्वे पोलिसात 2016 ते 2019 पर्यंत भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. आरोपीला 25 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास हवालदार राजेंद्र रोकडे करीत आहेत.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, डीबी पथकातील हवालदार राजेंद्र रोकडे, रवींद्र आखडमल, कॉन्स्टेबल विनोद आखडमल, भटु साळुंके, मनोज दाभाडे, योगेश दाभाडे. सचिन वाघ, सोमा ठाकरे, गोविंद कोळी, आरीफ तडवी, प्रशांत पवार, मनोज महाजन, प्रशांत बाविस्कर, उमेश पवार आदींच्या पथकाने केली.

 













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !