भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
40 प्राध्यापकांनी केली उत्स्फूर्तपणे आरोग्य तपासणी
Spontaneous response to health check-up camp at P.K. Kote Women’s College in Bhusawal भुसावळ (25 ऑगस्ट 2025) : शहरातील शांती नगरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयातील हेल्थ सेंटर व शहरातील आनंद नगरातील गोल्डन अवर हॉस्पीटलच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचार्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सोमवार, 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत करण्यात आले. यावेळी सुमारे 40 वर प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचार्यांची आरोग्य तपासणी आरएमओ डॉ.धनुष, डॉ.वैष्णवी लोखंडे यांनी करीत मोफत औषधोपचार केले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य शरद अग्रवाल होते.
40 प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचार्यांची मोफत आरोग्य तपासणी
मोफत आरोग्य शिबिरात रक्तदाब (बी.पी.), डायबीटीस (शुगर), कार्डीओग्राम (ईसीजी) तपासणी करण्यात आली तसेच मोफत औषधोपचार करून आहार व आरोग्याविषयी डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी सिस्टर गुनगुन कौशल, सिस्टर बरखा केशनिया, पीआरओ गणेश वाघ आदींची उपस्थिती होती.


हेल्थ ईज वेल्थ : प्राचार्य
प्रसंगी प्रभारी प्राचार्य अग्रवाल म्हणाले की, तुमचे आरोग्य सुदृढ असेल तर तुम्ही सर्व आव्हाने पेलू शकतात. हेल्थ ईज वेल्थ असून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमितपणे आरोग्य तपासणी करून घ्यावी व शिबिराच्या माध्यमातून डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करावे. याप्रसंगी प्रास्ताविक प्रा.दीपाली पाटील यांनी करीत आभारही मानले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रा.गिरीश सरोदे, प्रा.भावना शंकोपाळ, प्रशांत कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.




