भुसावळातील प्रभाग 21 मध्ये आयोजित मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
भाजपाचे माजी नगरसेवक निक्की बतरा व गोल्डन अवर हॉस्पीटलचा संयुक्त उपक्रम
Spontaneous response to free health camp organized in Ward 21, Bhusawal भुसावळ (26 ऑगस्ट 2025) : भुसावळ शहरातील आनंद नगरातील गोल्डन अवर हॉस्पीटल व भाजपाचे माजी नगरसेवक निक्की बतरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग 21 मधील सिंधी समाजबांधवांसाठी मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते तीन वाजेदरम्यान आयोजित मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आयोजित शिबिरात सुमारे 60 वर नागरिकांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.
नागरिकांनी दिला शिबिराला प्रतिसाद
प्रभाग क्रमांक 21 मधील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी या प्रभागाचे भाजपाचे माजी नगरसेवक निक्की बतरा व भुसावळातील आनंद नगरातील गोल्डन अवर हॉस्पीटलच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी बडा सेवा मंडलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरात रक्तदाब (बी.पी.), डायबीटीस (शुगर), कार्डीओग्राम (ईसीजी) तपासणी मोफत करण्यात आली तसेच मोफत औषधोपचारासह आरोग्याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.


यांची होती शिबिराला उपस्थिती
या शिबिराला गोल्डन अवर हॉस्पीटलचे आरएमओ डॉ.धनुज शिंगाडे तसेच त्यांचे सहकारी डॉ.हर्षल जाधव, डॉ.वैष्णवी लोखंडे, डॉ.सायली राठोड, नर्स बरखा केशनिया, नर्स शिवानी सावले व पीआरओ गणेश वाघ उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित डॉक्टरवृंदांचे माजी नगरसेवक निक्की बतरा तसेच झुलेलाल मंदिराचे अध्यक्ष मनोहरलाल सोडाई, सेवा मंडल सदस्य राजू वाधवानी, नानक मेडिकलचे संचालक नानक बुधराणी आदींनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. सूत्रसंचालन पीआरओ गणेश वाघ यांनी करून आभारही मानले.
आगामी काळात समाजोपयोग उपक्रम राबवणार : निक्की बतरा
माजी नगरसेवक निक्की बत्रा म्हणाले की, नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आरोग्य शिबिराचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले तसेच यापुढील काळात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवणार असून प्रभागातील नागरिकांच्या सेवेसाठी आपण कटीबद्ध आहोत.




