धुळ्यात घरात सुरू होता बनावट दारूचा कारखाना : गुन्हे शाखेच्या छापेमारीत दोन लाखांचा साठा जप्त


Fake liquor factory was running in a house in Dhule : Crime Branch raids, stocks worth Rs 2 lakh seized धुळे (26 ऑगस्ट 2025) : धुळ्यातील सहजीवन नगरात संशयीत घरातच देशी-विदेशी दारू बनवली जात असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर पोलिसांनी सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गणेश नारायण निकम (प्लॉट नं.12, चक्करबर्डी रोड, शासकीय दुध डेअरीजवळ, सहजीवन नगर, धुळे) यास याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळ्यातील सहजीवन नगरात संशयीत गणेश निकम हा मयत वडील नारायण बाजीराव निकम यांच्या घरात देशी-विदेशी दारू बनवण्याचा मिनी कारखाना चालवत असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. मंगळवार, 26 रोजी पथकाने छापेमारी करीत 90 हजार रुपये किंमतीचे स्पिरीट, 31 हजार 500 रुपये किंमतीचे स्पिरीट, 15 हजार रुपये किंमतीचे बाटली पॅक करण्याचे मशीन तसेच रॉयल स्टॅग, ऑफिसर चॉईस, एमडी आदी प्रकारच्या विविध दारूंच्या बॉटल्यांचे सुमारे पाच हजारांवर बुच तसेच पाण्याची टाकी व अन्य साहित्य मिळून एक लाख 68 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.




आरोपीविरोधात तीन गुन्हे
अटकेतील आरोपी गणेश निकमविरोधात धुळे शहर पोलिसात दोन तर चाळीसगाव रोड पोलिसात एक गुन्हा दाखल आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, पोलिस उपनिरीक्षक अमित माळी, पोलिस अंमलदार मच्छिंद्र पाटील, हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, हवालदार शीला सूर्यवंशी, हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !