चोपडा तालुक्यात खळबळ : अत्याचारातून अल्पवयीन गर्भवती

There is a stir in Chopda taluka : Minor gets pregnant due to abuse चोपडा (27 ऑगस्ट 2025) : सतत दोन वर्ष अत्याचार करण्यात आल्याने अल्पवयीन गर्भवती राहिली. ही घटना चोपडा शहरात घडली असून या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक करण्यात आली.
असे आहे प्रकरण
शिरपूर तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी चोपडा येथे बारावीच्या वर्गात शिक्षण घेते. या मुलीवर अविनाश वेस्ता पावरा याने जानेवारी 2023 मध्ये चोपडा शहरातील शिरपुर रोडवरील एका हॉस्पिटलच्या मागे असलेल्या पीडितेच्या मैत्रिणीच्या रुमवर चार वेळेस तसेच 26 जून 2025 रोजी सकाळी 11वा च्या सुमारास शिरपुर रोडालगत असलेल्या हरेश्वर मंदिराच्या पाठीमागे झाडा झुडपांममधे पीडितेवर अत्याचार केला.