यावलच्या बाबा नगरात गोमांस विक्री करणार्यास पकडले

Beef seller arrested in Baba Nagar, Yaval यावल (28 ऑगस्ट 2025) : शहरातील बाबा नगरात एक जण गोमांस विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी कारवाई करीत सहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एका विरुद्ध मंगळवारी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले यावल शहरात
शहरात चोपडा रोडालगत बाबा नगर आहे. या बाबा नगरात इब्राहिम खान कुरेशी हा तरूण गोमांस विक्री करत असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले. त्याच्याकडून सहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध यावल पोलिसात नाईक पुरुषोत्तम पाटील यांच्या फिर्यादीवरून प्राणी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.