भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे


Disaster management lessons for students at K. Narkhede School in Bhusawal भुसावळ (28 ऑगस्ट 2025) : भुसावळ शहरातील के.नारखेडे विद्यालयात विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे मंगळवार, 26 रोजी देण्यात आले. विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कार्यक्रमात काही कारणास्तव आग लागल्यास ती कशी विझवावी ? याबाबतची माहिती उदय मिठे व मयुर बर्‍हाटे यांनी दिली.

यावेळी आग विझवण्यासंदर्भातील प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले संवाद सुद्धा साधण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, उपमुख्याध्यापिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक एस.पी. पाठक, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील, कैलास सुरळकर, जयेश बर्‍हाटे, मुकेश व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, बी.बी.जोगी व सुरेश कापसे यांनी विद्यार्थ्यांना अचानक आपत्ती आल्यास कशा प्रकारे स्वतःचे रक्षण करावे या संदर्भात मार्गदर्शन केले.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !