भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये गणरायाची स्थापना
Ganesha statue installed at Tapti Public School in Bhusawal भुसावळ (28 ऑगस्ट 2025) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पाच दिवसीय गणपतीची स्थापना ढोल ताशांच्या गजरात वाजत-गाजत करण्यात आली.
रोज नित्य नियमाने शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांमार्फत आरती करून प्रसाद वाटप करण्यात येत आहे. शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर यांच्या उपस्थितीत गणपतीची स्थापना करण्यात आली. यावेळी विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





