पाडळसे येथे 35 वर्षीय महिलेस चौघांची मारहाण


35-year-old woman beaten up by four in Padalse यावल (28 ऑगस्ट 2025) : यावल तालुक्यातील पाडळसा या गावात एका 35 वर्षीय महिलेला पाहून एकाने महिलेसोबत अश्लील कृत्य केले. महिलेने याबाबत जाब विचारला असता त्याचा राग येऊन चौघांनी महिलेला मारहाण केली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी फैजपूर पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले नेमके
पाडळसा, ता.यावल या गावातील एका 35 वर्षीय विधवा महिलेस पाहून सुरेश नामदेव कचरे हे बोलले की तुझा नवरा मेला आहे, तर मजेत आहे. असे सांगून त्यांनी तिला डोळा मारला आणि अश्लील कृत्य केले. याबाबत सदर महिलेने जाब विचारला असता त्याचा राग येऊन सुरेश कचरेसह निर्मला सुरेश कचरे, गोविंदा सुरेश कचरे व मनोज सुरेश कचरे या चौघांनी या महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. तिच्या डाव्या हाताच्या पंजावर काठी मारून दुखापत केली. डोक्यावर मध्यभागी काठी मारून दुखापत केली. या चार जणांविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.




तपास सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संतोष चौधरी करीत आहे.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !