बुध्दीबळ स्पर्धेत भुसावळातील द वर्ल्ड स्कूलचे विद्यार्थी चमकले

Students of The World School in Bhusawal shine in the chess competition भुसावळ (28 ऑगस्ट 2025) : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग, भुसावळ यांच्याद्वारे भुसावळातील सेंट अलॉयसेस स्कूलमध्ये शालेय शासकीय तालुकास्तरीय मुलींच्या 14, 17, 19, वयोगटाच्या बुद्धिबळ स्पर्धा नुकत्याच झाल्या. या स्पर्धेत कोलते फाउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.
25 व 26 रोजी झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत द वर्ल्ड स्कूलमधील आठवीतील सानिध्य श्रीवास्तवने प्रथम तर सातवीतील रिद्धी ठाकरेने तृतीय क्रमांक अनुक्रमे 14 वयोगटात पटकावला.