भुसावळातील कोळी वाड्यात एकाची आत्महत्या


One commits suicide in Koli Wada, Bhusawal भुसावळ (28 ऑगस्ट 2025) : शहरातील जुना सातारा कोळी वाडा भागातील 55 वर्षीय प्रौढाने गळफास घेतला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसां अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रकाश पंढरी कोळी (55, रा. जुना सातारा कोळी वाडा, भुसावळ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सोमवार, 25 ऑगस्टला पहाटे पाचच्या सुमारास कोळी यांनी राहत्या घरातील पत्र्याला लागून असलेल्या सळईला दोरी बांधून गळफास घेतला. यात त्यांचा मृत्यू झाला.




या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक उध्दव डमाळे व पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करण्यात आली. शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !