1500 रुपयांची लाच भोवली : मुख्याध्यापकासह शिक्षक नंदुरबार एसीबीच्या जाळ्यात


गणेश वाघ
नंदुरबार (28 ऑगस्ट 2025) : सेवानिवृत्त कामाठ्याकडून देयक तयार करून देण्याच्या मोबदल्यात पंधराशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना तळोदा तालुक्यातील जांभयी (बोरद) आश्रमशाळेतील मुख्याध्यापकासह शिक्षकाला नंदुरबार एसीबीतील डॅशिंग पोलिस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अनिल देवराम झाल्टे (53) असे अटकेतील मुख्याध्यापकाचे तर भागवत नारायण जगताप (42) असे अटकेतील पदवीधर प्राथमिक शिक्षकाचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे शासकीय आश्रमशाळा, जांभयी, ता. तळोदा येथून सन 2014 मध्ये कामाठी या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. तक्रारदार यांचे सन 2006 ते 2014 पर्यंतचे प्रोत्साहन भत्त्याचे देयक 54 हजार 956 प्रलंबित होते. हे देयक तयार करून दिल्याच्या मोबदल्यात भागवत जगताप यांनी तक्रारदाराकडे बक्षीस म्हणून दिड हजारांची लाच मागणी केल्याची तक्रार मंगळवार, 26 रोजी एसीबीकडे करण्यात आली व पडताळणीत मुख्याध्यापकाने लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले व गुरुवारी सापळ्याअंती दोघांना अटक करण्यात आली.




यांनी केला सापळा यशस्वी
नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलिस निरीक्षक विकास लोंढे, विलास पाटील, विजय ठाकरे, देवराम गावीत, हेमंकुमार महाले आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

 













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !