शिवपूर कन्हाळ्यात पाय घसरून पडलेल्या महिलेचा मृत्यू


Woman dies after slipping in Shivpur Kanhala भुसावळ (28 ऑगस्ट 2025) : भुसावळ तालुक्यातील शिवपुर कन्हाळा येथे रोडवर पाय घसरून पडलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. जमीला छड्डु गवळी (70, रा.शिवपुर कन्हाळा ता. भुसावळ) असे मृताचे नाव आहे.

काय घडले महिलेसोबत
जमीला गवळी या महिला रोडवरून पायी चालत असताना अचानक पाय घसरल्याने त्या जमिनीवर पडल्या. या दरम्यान त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती भुसावळ तालुका पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. तपास पोलिस उपनिरीक्षक पूजा अंधारे करीत आहेत.
















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !