यावल-भुसावळ रस्त्यावर कंटेनर-रिक्षात भीषण अपघात : नऊ जण जखमी

Terrible accident in container-rickshaw on Yaval-Bhusaval road: Nine people injured यावल (28 ऑगस्ट 2025) : शहरातून भुसावळकडे जाणार्या रस्त्यावर असलेल्या महाराष्ट्र धाब्यासमोर अवजड साहित्याची वाहतूक करणार्या भल्या मोठ्या कंटेनर आणि प्रवासी वाहतूक करणार्या अॅपे रिक्षाचा अपघात झाला. या भीषण अपघातात नऊ जण जखमी झाले. जखमींमध्ये आठ महिलांचा समावेश आहे.
जखमींवर यावलला उपचार
या महिला ऋषिपंचमीनिमित्त तापी नदीवर स्नान करण्यासाठी गेल्या होत्या. अपघातात जखमी महिलांना मनसेचे चेतन अढळकर यांनी आपल्या खाजगी वाहनात टाकून रुग्णालयात दाखल केले. सर्व जखमी महिलांवर यावल ग्रामीण रुग्णालया उपचार सुरू आहे.
असा घडला अपघात
यावल शहरातून भुसावळकडे जाणार्या रस्त्यावर महाराष्ट्र ढाबा आहे. या ढाब्या समोरून गुरूवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास किनगाव येथील महिलांना ऋषीपंचमीनिमित्त तापी नदीत स्नान करून अॅपे रिक्षा (क्रमांक एम. एच. 19 बी. जे. 9923) द्वारे किनगावकडे परत जात होत्या. दरम्यान यावलकडून भुसावळ कडे जाणार्या अवजड साहित्य वाहतूक करणार्या कंटेनर (क्रमांक आर.जे. 32 जी.बी. 4256) या दोघांमध्ये अपघात घडला.
हे प्रवासी झाले जखमी
या अपघातामध्ये रिक्षा चालक प्रल्हाद माणिक सावळे (55, रा.मालोद), बेबाबाई वासुदेव धनगर (45), नंदा संजय धांडे (40), रत्ना गणेश धनगर (36), प्रतिभा भगवान धनगर (50), वैशाली संजय पाटील (42), सुरेखाबाई रतीलाल काटे-धनगर (50), लताबाई कैलास कोळी (40), योगीता माधव धनगर (42, सर्व रा.किनगाव बुद्रुक, ता.यावल) या जखमी झाल्या.
दरम्यान अपघातानंतर या रस्त्यावरून जळगाव जात असतांना मनसेचे चेतन अढळकर, किशोर नन्नवरे यांनी जखमी महिलांना पाहून या सर्व जखमी महिलांना आपल्या खाजगी वाहनाव्दारे उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.गौरव भोईटे, अधिपरिचारीका मंजुषा कोळेकर, अमोल अडकमोल, संजय जेधे यांनी जखमींवर उपचार केले. दरम्यान, अपघाताची मिळतात घटनास्थळी यावल पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अमित तडवी, मंगेश पाटील, संतोष पाटील, परमेश्वर जाधव, दिवाकर जोशी हे दाखल झाले अपघातग्रस्त दोघं वाहन पंचनामा करून त्यांनी यावल पोलीस ठाण्यात आणले आहे. तर या अपघात प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.