रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा : रेल्वेद्वारे 12 विशेष गाड्यांच्या सेवांचा विस्तार


Big relief for railway passengers: Railways expands services of 12 special trains भुसावळ (29 ऑगस्ट 2025) : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर साप्ताहिक विशेष गाड्यांच्या सेवांमध्ये वाढ केली आहे. यामुळे प्रवाशांना या गाड्यांच्या माध्यमातून सुविधा मिळणार आहे. देशाच्या विविध भागात जाणार्‍या या गाड्यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातून धावणार्‍या 12 रेल्वे गाड्यांना मुदत वाढ दिली आहे, यामुळे या गाड्या आता डिसेंबर, जानेवारीपर्यत धावणार आहे, यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.




मुदतवाढ दिलेल्या गाड्यांमध्ये उधना-सुबेदारगंज विशेष गाडीची सेवा 30 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. सुबेदारगंज-उधना विशेष गाडीची सेवा 29 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

वलसाड-दानापूर विशेष गाडीची सेवा 29 डिसेंबरपर्यंत,दानापूर – वलसाड विशेष गाडीची सेवा 30 डिसेंबरपर्यंत धावणार आहे.

उधना-खुर्दा रोड विशेष गाडीची सेवा 31 डिसेंबरपर्यंत राहणार आहे. खुर्दा रोड -उधना विशेष गाडीची सेवा 2 जानेवारी 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

उधना-धनबाद विशेष गाडीची सेवा 26 डिसेंबरपर्यंत, धनबाद – उधना विशेष गाडीची सेवा 28 डिसेंबर, पर्यंत वाढविण्यात आली आहे. उधना-जयनगर विशेष गाडीची सेवा 28 डिसेंबर, जयनगर-उधना विशेष गाडीची सेवा 29 डिसेंबरपर्यंत, उधना-पाटणा विशेष गाडीची सेवा 26 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली.

पाटणा-उधना विशेष गाडीची सेवा 27 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. या गाड्यांच्या थांब्यात कुठलाही बदल केला नाही, प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !