भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात वादविवाद मंडळाचे उद्घाटन
भुसावळ (30 ऑगस्ट2025) : भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात वाङमय मंडळ, वादविवाद मंडळ आणि मराठी विभाग, संगीत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाङ्मय मंडळ आणि वादविवाद मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
प्रमुख वक्ते प्रा.डॉ.मनोज पाटील होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.जी.आर.वाणी होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य, वाद-विवाद मंडळाचे प्रमुख आणि मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.डी.एन.पाटील होते.

प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये भाषिक क्षमता विकसित व्हावी आणि वाङ्मयीन अभिरुची निर्माण व्हावी, या उद्देशाने वाद-विवाद व वाङ्मयमंडळा अंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात असे आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
प्रमुख वक्ते प्रा.डॉ.मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाद-विवाद, वाङ्मयात अभिरुची निर्माण व्हावी याविषयी मार्गदर्शन केले. इच्छाशक्तीच्या जोरावर आपण वाद-विवाद स्पर्धा जिंकू शकतो. गुरु आणि शिष्याच्या माध्यमातून कोणत्याही कर्तृत्वाची इच्छा असेल तर शक्ती पूर्ण होते ही संकल्पना मांडली. हारणे आणि जिंकणे चालूच असते मात्र त्यातून ऐकणे आणि विचार मांडायला शिका हे वक्त्यांनी सांगितले.
उपप्राचार्य डॉ.जी.आर.वाणी यांनी विद्यार्थ्यांना वाद-विवाद स्पर्धेत भाग घेण्यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच अवांतर वाचनाची आवड ठेवणे आवश्यक आहे हे आपल्या विचारांमधून सांगून विविध स्पर्धा कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आवाहन केले. या कार्यक्रमांतर्गत संगीत विभागातर्फे ‘भक्तीतरंग’ या गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
अनुष्का आंबेकर, करुणा बार्हे, सागर बेंद्रे, साक्षी जैन, प्रगती तांबटकर, कीर्तनकार ह.भ.प.हनुमंत गुर्जर उर्फ कोमल महाराज यांनी ‘भक्तीतरंग’ या कार्यक्रमात आपले भक्ती गीते सादर केलीत तसेच देवार्पण भौमिक, वीरेंद्र वाणी, विनीत वाणी यांचे सहकार्य लाभलेफ
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन प्रा.वंदना नेमाडे तर आभार प्रा.डॉ.स्वाती महाजन यांनी मानले. प्रा.गुणवंत सोळुंके डॉ.दिनानाथ पाठक, प्रा.गौतम भालेराव यांचे सहकार्य लाभले. डॉ.विद्या पाटील, डॉ.पी.एच.इंगोले, डॉ.राजेंद्र तायडे, डॉ.सचिन राजपूत, डॉ.जितेंद्र अडोकार, प्रा.कौस्तुभ पाटील, भूपेंद्र बाणाईत, डॉ.नीलिमा पाटील, प्रा.एकता बजाज हे प्राध्यापक उपस्थित होते. विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




