भुसावळातील ताप्ती स्कूलमध्ये मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त नॅशनल स्पोर्ट डे उत्साहात


National Sports Day celebrated with enthusiasm on the occasion of Major Dhyan Chand’s birth anniversary at Tapti School in Bhusawal भुसावळ (30 ऑगस्ट2025) : भुसावळातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शुक्रवारी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल निना कटलर यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅथेलेटिक्समध्ये जे खेळ असतात ते सर्व खेळ विद्यार्थ्यांनी सादर केले.

प्रसंगी प्रिन्सीपल निना कटलर यांनी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले. प्रसिद्ध हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यातआले.


प्रिन्सीपल म्हणाल्या की, मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस सर्वत्र साजरा करण्यात येतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळांकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. नेहमी खेळत राहिल्याने आपली हेल्थ चांगली असते. यावेळी ताप्ती पब्लिक स्कूल मधील 300 विद्यार्थ्यांनी मिळून शाळेतील ग्राउंड वर हॉकीची उभे राहून मानवी रांगोळी तयार केली होती. ही रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी देखील गर्दी केली. राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !