भुसावळातील गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा


National Sports Day celebrated at Gadgebaba Hindi College, Bhusawal भुसावळ (30 ऑगस्ट 2025) : श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. क्रीडा अधिकारी डॉ.प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले. त्यात प्रामुख्याने कॅरम, बॅडमिंटन, रस्सीखेच, टेबल टेनिस, बुद्धिबळ व क्रिकेट या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. रमेश जोशी सरांनी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन केले. या दिवसाचे महत्व सांगताना क्रीडा दिवस का साजरा करण्यात येतो याविषयी डॉ.रमेश जोशी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, प्रसिद्ध हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनी आपले आरोग्याचे संवर्धन व्हावे यासाठी नियमित विविध खेळ खेळले पाहिजे, तसेच क्रीडा स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यासाठी डॉ. सुधीर शर्मा, प्रा अनुपम शर्मा, डॉ विवेक जोशी व सर्व स्टाफने परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात भाग घेऊन सर्व स्पर्धा पार पाडल्या. मुलींनीही आपला सहभाग नोंदवला.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !