भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात


भुसावळ (30 ऑगस्ट 2025) : शहरातील कोलते फाउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यातआला.

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो तसेच हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ शाळेत गत आठवड्यापासून विविध खेळांचे आयोजन करण्यात आले.


कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी क्रीडा विभाग प्रमुख राजेंद्र कुलकर्णी व संयोजक बी.एन.पाटील यांचे स्वागत शाळेचे संचालक सीए रोहित कोलते यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. त्यांचे स्वागत क्रीडा शिक्षक सुमित दास गुप्ता यांनी केले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खेळांचे महत्त्व पटवून दिले.

मुख्याध्यापिका पेट्रिश्या ह्यसेट यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. क्रीडा शिक्षक सुमित दास गुप्ता व शिक्षिका अश्विनी पाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !