जळगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई : जळगावसह साक्रीत वाहन चोरणारे चोरटे जाळ्यात


Major action by Jalgaon city police : Thieves who stole vehicles in Jalgaon and other cities caught जळगाव (31 ऑगस्ट 2025) : जळगाव शहरासह धुळे जिल्ह्यातील साक्री पोलिस ठाणे हद्दीत दुचाकी चोरी करणार्‍या अट्टल चोरट्यांना : जळगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. इरफान खान उस्मान खान पठाण (21, मूळ रा.साक्री, जि.धुळे, ह.मु. गेंदालाल मिल, जळगाव) अदिल शेख उर्फ नाट्या माजिद शेख (19, रा.गेंदालाल मिल, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून चोरी केलेली वाहने जप्त करण्यात आली.

अशी आहे चोरीची पार्श्वभूमी
जळगावच्या हमाल वाडा, शिवाजी नगर येथे राहणार्‍या उदयकुमार सुभाष कोचुरे यांची 24 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 30 हजार रुपये किंमतीची होंडा क्टिव्हा मोपेड चोरीला गेली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोललस निरीक्षक सागर शिंपी यांनी दोन पथके तयार केली. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकाने दोघा आरोपींना अटक केली. 2024 मध्ये साक्री पोलीस स्टेशन हद्दीतून दुचाकी चोरीची कबुली दिली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरच्या गुन्हे शोध पथकातील सहा.फौजदार सुनील पाटील, पोलिस हवालदार उमेश भांडारकर, सतीश पाटील, योगेश पाटील, नंदलाल पाटील, विरेंद्र शिंदे, दीपक शिरसाठ, भगवान पाटील, पोलीस नाईक सुधीर साळवे, अमोल ठाकूर, भगवान मोरे, प्रणय पवार आणि राहुलकुमार पांचाळ यांनी सहभाग घेतला.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !