भुसावळातील देविदास भोळे महाविद्यालयात हॉकीच्या जादुगाराची जयंती उत्साहात


Hockey wizard’s birth anniversary celebrated with enthusiasm at Devidas Bhole College in Bhusawal भुसावळ (31 ऑगस्ट 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात शारिरीक शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनी हॉकीचे जादुगार महान खेळाडू मेजर ध्यानचंदजी यांची जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ.राजू फालक यांच्याहस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली.

प्राचार्य डॉ.राजू फालक म्हणाले की, 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन हा दिवस आपल्या देशाच्या गौरवशाली क्रीडा परंपरेचे प्रतीक आहे. कारण आजच्याच दिवशी भारताचे हॉकीचे जादूगार महान खेळाडू मेजर ध्यानचंदजी यांची जयंती आहे. एकदा हॉकी हातात घेतल्यावर मेजर हे मैदानावर जणू काही जादूच करत. म्हणूनच जगभर त्यांना हॉकीचा जादूगार म्हणून गौरवले जाते.


त्यांच्या अद्भुत खेळामुळे भारताने 1928, 1932 आणि 1936 या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे, त्या काळी भारताला जगात हॉकीचा बादशहा म्हणून ओळख मिळवून देण्यात ध्यानचंद यांचा सिंहाचा वाटा होता. जर्मनीमध्ये झालेल्या 1936 च्या बर्लिन ऑलिंपिकमध्ये तर त्यांनी आपल्या खेळाने संपूर्ण जगाला थक्क केले. हिटलरसुद्धा त्यांच्या खेळाचा चाहता झाला होता, ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे.

ध्यानचंदजींच्या खेळाची खासियत म्हणजे त्यांचे अचूक नियंत्रण, विलक्षण पासिंग, वेग आणि गोल करण्याची क्षमता. हॉकी हा खेळ त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर जगभर लोकप्रिय करून दाखवला. त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविले.
खेळ केवळ पदकं किंवा कीर्ती मिळवण्यासाठी नसतो, तर तो आपल्याला शिस्त, संघभावना, परिश्रम, आत्मविश्वास आणि निरोगी जीवनशैली शिकवतो, हा संदेश ध्यानचंदांच्या जीवनातून आपल्याला मिळतो.

यांची होती उपस्थिती
यावेळी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.गायत्री नेमाडे, प्रा.दीपक जैस्वार, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.खिलचंद धांडे, प्रकाश सावळे व विद्यार्थी खेळाडू उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !