पुणे-जम्मू तवी-पुणे झेलम एक्स्प्रेसची एक फेरी रद्द
One round of Pune-Jammu Tawi-Pune Jhelum Express cancelled भुसावळ (1 सप्टेंबर 2025) : जम्मू विभागातील झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या परिचालनावर परिणाम झाला आहे. त्यानुसार उत्तर रेल्वेच्या कठुआ-माधोपुर पंजाब रेल्वे स्थानकांदरम्यान वाहतूक निलंबित झाल्यामुळे खालील गाड्या रद्द करण्यात आली आहे.
शनिवार, 30 रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणारी गाडी क्रमांक 1077 पुणे-जम्मू तवी झेलम एक्स्प्रेस पूर्णतः रद्द करण्यात आली आहे.

रविवार, 31 रोजी जम्मू तावी रेल्वे स्थानकावरून सुटणारी गाडी क्रमांक 11078 जम्मू तवी-पुणे झेलम एक्स्प्रेस पूर्णतः रद्द करण्यात आली आहे.
प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना वरील बदल लक्षात घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.




