शिरपूर महामार्ग वाहतूक शाखेचे वाहन उलटले : एका अंमलदाराचा मृत्यू तर दोघे जखमी


Shirpur Highway Traffic Division vehicle overturns: One official dies, two injured शिरपूर (2 सप्टेंबर 2025) : गस्तीवर असलेल्या शिरपूर महामार्ग वाहतूक शाखेच्या वाहनाला अपघात झाल्यानंतर हे दहिवद गावाजवळ वाहन उलटून एका अंमलदाराचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. हा अपघात मंगळवार, 2 सप्टेंबर रोजी दुपारी घडला.

अपघात कसा घडला?
शिरपूर महामार्ग वाहतूक शाखेचे बोलेरो वाहन (क्रमांक एम.एच.18 बी.एक्स.0232 हे सोमवारी दुपारी एक वाजता गस्तीवर जात असताना बोलेरो वाहनाचा मागील टायर फुटला व वाहन अनियंत्रीत होवून बोलेरो महामार्गावर पलटले. या अपघात नवल नवलसिंग वसावे या कर्मचार्‍याचा मृत्यू झाला तर प्रकाश जाधव व अनिल पारधी जखमी झाले. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील भारत पेट्रोल पंपाजवळ घडला.

जखमींवर तत्काळ जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस कर्मचार्‍याच्या अपघाती मृत्यूने शिरपूर तालुका पोलिस ठाणे व संपूर्ण पोलिस वर्तुळात शोककळा पसरली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !