भुसावळातील ई मिलिदच्या मिरवणूक मार्गाची व्हावी दुरुस्ती : पालिका प्रशासनला साकडे


भुसावळ (2 सप्टेंबर 2025) : भुसावळ शहरात ई मिलिदच्या पार्श्वभूमीवर जुलूस (मिरवणूक) काढण्यात येणार असून मार्गाची व्हावी दुरुस्ती व्हावी, अशी मागणी भुसावळ शहर काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागातर्फे मुख्याधिकारी राजेंद्र फातले व प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात ईद मिलाद-उन-नबीच्या मुख्य जुलूस मार्गाची दुरूस्ती करावी तसेच अमरदीप चौक, मटन मार्केट, शिवाजी नगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यादरम्यान रस्त्याची डागडूजी करण्याची मागणी करण्या आली.


निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मो.मुनव्वर खान, शहराध्यक्ष सलीम गवळी, महिला शहराध्यक्ष यास्मीन बानो, जॉनी गवळी, अकील शाह, सै.कैफ, अनिस महिलक, साबीर शेख उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !