भ्रष्ट चेहर्यांना यापुढे भाजपात प्रवेश नाहीच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : खान्देशात ठिकठिकाणी सभा
जळगाव : भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना भाजपात यापुढे प्रवेश दिला जाणार नाही शिवाय प्रवेश द्यायचा असल्यास फिल्टर लावण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे म्हणाले. जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सभेला संबोधित केले. ते म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीची आजची अवस्था खूप वाईट आहे. परंतु ही अवस्था आम्ही नव्हे तर त्यांनीच केली आहे. गेल्या पाच वर्षांत सक्षम विरोधी पक्ष, जनतेचा आवाज होण्याची संधी विरोधकांना मिळाली होती; परंतु त्यांना ही संधी साधता आली नाही. सत्ता जावून 5 वर्षे झाली परंतु त्यांच्या जगण्यातील मुजोरी कायम आहे, असेही ते म्हणाले.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेकांवर होणार गुन्हे दाखल
धुळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहाराबाबत गुन्हे दाखल करण्याचेे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने सरकार गुन्हा दाखल करणार असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह तत्कालीन संचालकांविरोधात कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले.