दहिगाव खून प्रकरणातील दोषींवर हवी कठोर कारवाई

यावल पोलिसात ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन


All India Panthers Sena’s statement to Yaval Police यावल (4 सप्टेंबर 2025) : यावल पोलिस ठाण्यात ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले व दहिगाव येथील इम्रान पटेल यांच्या खून प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींना कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावल पोलिसात गुरुवारी पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्याकडे ऑल इंडिया पँथर सेना रावेर तालुकाध्यक्ष जितू इंगळे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

यात त्यांनी म्हटले आहे की, दहिगाव गावाच्या बाहेर विरावली रस्त्यावर इमरान पटेल (21) वर्षीय तरुणांची गावातील गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी हत्या केली. या हत्येत अजून काही जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यावल पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींना कठोर शासन करावे.

इम्रान पटेल यांच्या कुटुंबास शासनाकडून आर्थिक मदत व संरक्षण देण्यात यावे. गावातील अवैध व्यवसाय व गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !