भुसावळातील गोल्डन अवर रुग्णालयात तहसीलदार निता लबडे यांच्याहस्ते श्रींची आरती
रुग्णालयातील विविधांगी सुविधा पाहून व्यक्त केले समाधान
भुसावळ (5 सप्टेंबर 2025) : शहरातील आनंद नगरस्थित गोल्डन अवर रुग्णालयात सालाबादाप्रमाणे श्रींची स्थापना करण्यात आली आहे. गुरुवारी भुसावळ शहराच्या डॅशिंग तहसीलदार निता लबडे यांनी रुग्णालयाला भेट दिल्यानंतर त्यांच्याहस्ते श्रींची आरती करण्यात आली.
शहरातील नामांकीत अशा गोल्डन अवर रुग्णालयात दरवर्षी विघ्नहर्त्याची स्थापना करण्यात आली. गुरुवार, 4 सप्टेंबर रोजी भुसावळ तहसीलदार सौ.निता लबडे यांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालयाचे सर्वेसर्वा डॉ.सांतनू कुमार साहू व रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.ईती साहू यांनी त्यांचे स्वागत केले. तहसीलदारांनी यावेळी डॉ.साहू यांच्याकडून रुग्णालयातील विविध सुविधांची माहिती जाणून समाधान व्यक्त केले.


यावेळी तहसीलदार सौ.निता लबडे यांच्याहस्ते श्रींची आरती करण्यात आली. याप्रसंगी रुग्णांसह त्यांचे नातेवाईक तसेच फार्मासिस्ट जितेश ढाके, सुपर वायझर रियाज पटेल, एच.आर.गिरीश कोळी, रुचिता इंगळेंसह गोल्डन अवर हॉस्पीटलचे पीआरओ गणेश वाघ उपस्थित होते.




