भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात गुरुजणांचा सन्मान
Gurus honored at K. Narkhede School in Bhusawal भुसावळ (5 सप्टेंबर 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरुवार, 4 सप्टेंबर रोजी ‘अभिरुप विद्यालय’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला. या दिनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडून विद्यालयाचा कार्यभार अतिशय उत्तमरित्या सांभाळला. दुपारी तीन वाजता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
शिक्षकांचा झाला गौरव
कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,संगणक विभाग कर्मचारी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. सर्वांना पालक शिक्षक संघातर्फे भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे ऑनररी जॉ. सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष भागवत पाटील, उपमुख्याध्यापिका एस.ए.अडकमोल, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, पर्यवेक्षक एस.एल.राणे, पालक शिक्षक संघाचे सहसचिव अनिल तायडे व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रास्ताविक भागवत पाटील यांनी केले. बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी रिद्धी रवींद्र बाविस्करने आपले मनोगत व्यक्त केले.पालकांतर्फे पालक शिक्षक संघाचे सहसचिव अनिल तायडे यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक प्रतिनिधी एस.पी.झांबरे यांनी मनोगत व्यक्त केले. पी.व्ही.पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष मकरंद नारखेडे, उपाध्यक्ष किशोर नारखेडे, चेअरमन श्रीनिवास नारखेडे, संजीवभाऊ नारखेडे व इतर पदाधिकारी यांनी सर्व शिक्षकवृंदांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन जान्हवी पाटील हिने तर कुणिका बेंडाळेने आभार मानले.




