भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात


भुसावळ (5 सप्टेंबर 2025) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना भेट वस्तू देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर होत्या.

शिक्षकांनी सादर केले सांस्कृतिक कार्यक्रम
व्हा.प्रिन्सिपल मनप्रीत कौर, श्रद्धाली घुले, कार्यालयीन अधीक्षक सविता सहजे यांच्या सोबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रिन्सिपल निना कटलर यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.


प्रसंगी प्रिन्सिपल निना कटलर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाबद्दल उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मन जिंकली. सूत्रसंचालन सोफिया पीबॉडी यांनी तर आभार शेख कय्यूम यांनी मानले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !