निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी…! फुलांच्या वर्षावात भुसावळातील गोल्डन अवर रुग्णालयात साश्रू नयनांनी विघ्नहर्त्याला निरोप
Saying goodbye, God, now it must be an order…! In the midst of a shower of flowers, Sasru bid farewell to Vighnaharta with tearful eyes at Golden Hour Hospital in Bhusawal. भुसावळ (6 सप्टेंबर 2025) : शहरातील आनंद नगरस्थित गोल्डन अवर रुग्णालयात मोठ्या भक्तीभावाने स्थापन करण्यात आलेल्या गणरायाला फुलांचा वर्षाव करीत साश्रू नयनांनी व पुढच्या वर्षी लवकर या ! च्या जयघोषात निरोप देण्यात आला.
सालाबादाप्रमाणे रुग्णालयात श्रींची स्थापना करण्यात आली होती तर दहा दिवसांच्या उत्सव काळात विविध मान्यवरांनी रुग्णालयाला भेटी दिल्यानंतर त्यांना आरतीचा मानही देण्यात आला.


शुक्रवार, 6 रोजी दुपारी 12 वाजता रुग्णालयाचे सर्वेसर्वा डॉ.सांतनू कुमार साहू व रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.ईती साहू यांच्याहस्ते गणरायाची विधीवत आरती करून फुलांचा वर्षाव करण्यात आला. यानंतर कर्मचार्यांसह रुग्णांच्या नातेवाईकांनी गणरायाचा जयघोष करीत गणपती बाप्पा मोरय्या, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत जयघोष केल्याने वातावरण दणाणले होते.
यावेळी वाद्याच्या तालावर गणेशोत्सव मिरवणुकीत रुग्णालयाचे कर्मचारी काही अंतरापर्यंत थिरकले. रुग्णालय इन्जार्ज जितेश ढाके, एच.आर.प्रमुख गिरीश कोळी, गोल्डन अवर हॉस्पीटलचे पीआरओ गणेश वाघ तसेच कर्मचारी वृंद, नर्सिंग स्टाफ मिरवणुकीत सहभागी झाला.




