जळगाव जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कूलचे वर्चस्व

भुसावळातील बियाणी स्कूलचा मुला-मुलींचे संघ नाशिक विभाग स्तरावर


भुसावळ (6 सप्टेंबर 2025) : जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हॉकी जळगाव व बियाणी एज्युकेशन ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, 4 सप्टेंबर 25 रोजी बियाणी मिल्ट्री स्कूलमध्ये येथे जिल्हास्तरीय 17 वर्षातील मुला मुलींच्या हॉकी शालेय स्पर्धा झाल्या. या स्पर्धेतील विजयी व उप विजयी संघास बियाणी मिलिटरी स्कूलचे प्राचार्य डी.एम. पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष पदा जिल्हाध्यक्ष तालुका समन्वय डॉ.प्रदीप साखरे, आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू व जामनेर तालुका क्रीडा समन्वयक डॉ.आसिफ खान, दिलीप संगेल यांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धांमध्ये 17 वर्ष मुले व मुली यांचे एकूण 10 संघ सहभागी झाले.

असा आहे स्पर्धेचा निकाल
17 वर्षाखालील मुले- 17 वर्षीय मुले व मुली शालेय हॉकी स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे


अंतिम मुलांचा सामना बियाणी मिलिटरी स्कूल व एमआय तेली इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आला. अत्यंत चुरशीच्या सामन्यात बियाणी मिलिटरी स्कूल ने 2-1 असा विजय मिळवला.

तृतीय सामना अलहिरा उर्दू स्कूल, भुसावळ व ताप्ती स्कूल, भुसावळ यांच्यात झाला. या सामन्यात अलहिरा या स्कूलने 3-2 असा विजय संपादन केला.

मुलींचा अंतिम सामना बियाणी पब्लिक स्कूल व डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ यांच्यात झाला. या सामन्यात बियाणी पब्लिक स्कूलने 1-0 असा विजय संपादन केला.

तृतीय सामना ताप्ती पब्लिक स्कूल विरुद्ध सेंट मेरी स्कूल अमळनेर यांच्यात झाला. त्यात ताप्ती स्कूलने 3_1 असा विजय संपादन केला बियाणी , भुसावळ विजयी बी झेड उर्दू हायस्कूल भुसावळ, उपविजेता.

हॉकी शालेय 17 वर्ष मुले
बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळने प्रथम क्रमांक पटकावला. एम.आय.तेली इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ द्वितीय स्थानी राहिला व अलहिरा उर्दू हायस्कूल, भुसावळला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.

हॉकी शालेय 17 वर्ष मुली
बियाणी पब्लिक स्कूल थम तर डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ द्वितीय स्थानी तर ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.

विजयी व उप विजयी संघातील खेळाडूंना हॉकी जळगाव व स्पोर्ट्स हाऊस जळगावतर्फे पदक देऊन गौरविण्यात आले.

पंच म्हणून अमन तेली व तौसीफ बेग, अमीर शेख, प्रणव बारेला यांनी काम पाहिले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक एच.एन.पाटील, युसूफ खान व बियाणी मिलिटरी स्कूलच्या सर्व कर्मचारी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !