मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणार्‍या भुसावळ तालुक्यातील निंभोर्‍याच्या संशयीताविरोधात गुन्हा


Case registered against suspect of Nimbhorya in Bhusawal taluka for using abusive language against Maratha community भुसावळ (8 सप्टेंबर 2025) : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाबद्दल सोशल मिडीयावर अपशब्द वापरणार्‍या भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथील दीपक हरी सुरवाडे विरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयीताच्या कृतीने मराठा समाज तीव्र संतप्त झाला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
मराठा समाजाचे रवींद्र जगन्नाथ ढगे (53, श्रीराम नगर, वांजोळा रोड, भुसावळ) यांनी भुसावळ तालुका पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, दीपक हरी सुरवाडे (निंभोरा, ता.भुसावळ) याने इन्टाग्रामवर मराठा समाज व मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दात टीपणी केल्याचे नमूद आहे. संशयीत सुरवाडे याने शुक्रवार, 5 रोजी रात्री 8.43 वाजता कुठल्यातरी चारचाकी वाहनात बसून व्हिडिओ बनवून प्रसारीत केल्याने मराठा समाजाच्या भावना दुखावल्याचे तक्रारीत नमूद आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !