महिना भरापूर्वीच झाले लग्न : बहिणीला भेटण्यासाठी जाताना भीषण अपघातात रावेर तालुक्यातील दोघे भावंड ठार


Two siblings from Raver taluka killed in a horrific accident while going to meet their sister रावेर (9 सप्टेंबर 2025) : जळगाव जिल्ह्यात अपघातांची मालिका कायम आहे. चोपडा तालुक्यात भावंडांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रावेर तालुक्यातही भीषण अपघात घडला. बहिणीला भेटण्यासाठी जाणार्‍या भावंडांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने उडवल्याने दोघांचा मृत्यू झाला.

हा अपघात रावेर तालुक्यातील अभोडा ता.रावेरनजीक सोमवारी दुपारी चार वाजता घडला. रामदास प्रकाश बारेला (19) आणि करण प्रकाश बारेला (8, रा.गुलाबवाडी, ता.रावेर) अशी मृतांची नावे आहेत. विशेष म्हणजे रामदास बारेला याचे महिनाभरापूर्वीच लग्न झाल्याचे सांगण्यात आले.






रामदास व करण हे रसलपूर ता. रावेर येथे बहिणीला भेटण्यासाठी गेले होते. तिथून दुचाकीने परत येत असताना अभोडा गावानजीक त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली, त्यात दोघे जण ठार झाले.

चोपडा तालुक्यातही भीषण अपघात
वर्डी-माचला फाट्यादरम्यान मगन आणि रगन बारेला यांच्या दुचाकीला चारचाकीने जोरदार धडक दिली. यात दोघे जण ठार झाले. या अपघातप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !