नेपाळमध्ये माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जाळले : 22 जणांचा मृत्यू 400 हून अधिक जखमी

शस्त्रेही हिसकावली ; निदर्शनामुळे सरकार उलथवले


Former Prime Minister’s wife set on fire in Nepal : 22 dead, over 400 injured काठमांडू (9 सप्टेंबर 2025) : नेपाळ देशात सुरू असलेल्या हिंसक घटनांमुळे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिला असून लष्कराच्या हेलिकॉप्टरने त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

हिंसक निदर्शनांमुळे नेपाळमधील परिस्थिती बिघडली असून निदर्शकांनी संसद, पंतप्रधान, राष्ट्रपतींच्या वैयक्तिक निवासस्थानाला आग लावली आणि सुरक्षा दलांकडून शस्त्रे हिसकावून घेतली. त्यांनी दोन माजी पंतप्रधानांच्या घरांवरही हल्ला केला. माजी पंतप्रधान झालानाथ खनाल यांच्या घराला आग लावण्यात आली. त्यांच्या पत्नी राजलक्ष्मी चित्रकर या यामध्ये गंभीर भाजल्यानंतर त्यांना तातडीने कीर्तिपूर बर्न हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे त्यांचा मृत्यू झाला.

दुसरीकडे, माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांना त्यांच्या घरात घुसून मारहाण करण्यात आली तर अर्थमंत्री विष्णू पौडेल यांना काठमांडूमधील त्यांच्या घराजवळ पळून-पळून मारण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक निदर्शक त्यांना छातीवर लाथ मारताना दिसत आहे.

राजधानी काठमांडू आणि आसपासच्या भागात झालेल्या संघर्ष आणि जाळपोळीत आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 400 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !