राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच येणार रक्कम : 344 कोटींचा निधी वितरित

Money will soon be in the accounts of beloved sisters in the state: Funds of Rs 344 crores distributed मुंबई (10 सप्टेंबर 2025) : लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा लाभ अदा करण्यासाठी बाज्य शासनाने मंगळवारी सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटी रुपये निधी वितरित केला. सप्टेंबरमध्ये दोन्ही हप्ते एकत्र मिळतील, अशी चर्चा असलीतरी परकारने आता ऑगस्टचा निधी स्वतंत्रपणे जारी केला आहे.
एकाच महिन्याचा या महिन्यात लाभ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी (ladki bahin yojana) राज्यात दोन कोटी 48 लाख लाभार्थी आहेत. आतापर्यंत जुलै 2025 महिन्यापर्यंतचे दीड हजारांचा लाभ महिलांच्या खात्यात जमा झाला मा ऐन गणेशोत्सवात ऑगस्ट महिन्याचा हप्ता लांबणीवर पडल्याने लाडक्या बहिणींमध्ये नाराजी होती.
सप्टेंबर महिना सुरू होऊन आठ दिवस झाले तरी पैसे अद्याप खात्यावर जमा झालेले नाही त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा लाभ कधी जमा होणार ? याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागली होती.
महिला बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी ऑगस्ट महिन्याचा लाभ लवकरच जमा होईल, असे आश्वासन दिले होते मात्र सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने मंगळवारी शासन निर्णय जारी करीत चालू आर्थिक वर्ष 2025- 26 मध्ये या योजनेसाठी एकूण तीन हजार 960 कोटी रुपये मंजूर केल्याने एकाच महिन्याचा लाभ लवकरच महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे.
